---Advertisement---

भटके-विमुक्त समाजातील पात्र नागरिकांना शासकीय कागदपत्रांचे वाटप!

---Advertisement---

शेगाव (प्रशांत पवार) : भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी शेगाव येथील महसूल प्रशासन आणि भटके-विमुक्त कल्याणकारी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

या कॅम्पच्या माध्यमातून समाजातील पात्र ३९ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र यासह विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कागदपत्रांच्या अभावामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार कानडे, महसूल अधिकारी राजेश राठोड, राज्यपाल नियुक्त जिल्हा अशासकीय सदस्य दामोदर परकाळे, तसेच परिषदेचे तालुका अशासकीय सदस्य केशव लांजुडकर व सतीश आडोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

अनेकदा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येतात. ही अडचण दूर करून शासनाच्या सुविधा थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. कॅम्पमध्ये महसूल प्रशासनातील संबंधित अधिकारी, भटके-विमुक्त कल्याणकारी परिषदेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

“कागदपत्रे ही केवळ ओळखीची साधने नसून शासनाच्या हक्काच्या योजनांपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा मार्ग आहेत. त्यामुळे भटके-विमुक्त समाजातील एकही पात्र नागरिक कागदपत्रांच्या अभावामुळे शासकीय सुविधांपासून वंचित राहू नये,” या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment