---Advertisement---

शेगावात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील नागझरी रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर आनंदा काठोळे (वय अंदाजे ५४, रा. गणेश नगर, माळीपुरा, शेगाव) हे १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान आपल्या मोटारसायकलने शेताकडे जात होते. नागझरी रोडवरील युवराज बापू देशमुख यांच्या घरासमोर ते आले असता अज्ञात वाहनचालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात मुरलीधर काठोळे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. धडकेमुळे त्यांच्या होंडा शाइन मोटारसायकलचेही नुकसान झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.

या प्रकरणी मयताचे मावसभाऊ सागर वसंता दिडोकार (वय ३५, रा. सावता चौक, माळीपुरा, शेगाव) यांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिस ठाण्यात कायमी अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 281, 106(1), 324(2) तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम 134, 177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास शेगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी रवी इंगळे करीत आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment