---Advertisement---

मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना ब्लँकेट वाटप!

---Advertisement---

जळगांव जामोद (आकाश बोरसे) : अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव, माजी केंद्रीय मंत्री व खासदार माननीय मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त 27 सप्टेंबर 2025 रोजी निहालवाडी (ता. जामोद) येथे गरीब व गरजू आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या वेळी जळगांव जामोद तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ऍड. भालेराव, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अच्छेखा पठाण, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, समाधान दामधर, कैलास भाऊ बोडखे, श्रीकृष्ण केदार, एम. आसिफ इक्बाल, अय्याज पुणेवाला, बशीर खा पठाण, किसन दामधर, शिवनारायण धुर्डे, योगेश कुंवर, रमेश भगत, सुभाष ढगे, अमोल भगत, रमेश धुर्डे, विशाल शिरसागर, वैभव हांडे, सुनिल दलाल, निलेश दलाल, बब्बू भाई यांच्यासह इतर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून वासनिक यांच्या दीर्घायुष्य व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. समाजहितासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे स्वागत होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment