---Advertisement---

दिल्ली बॉम्बस्फोट तपासाची दिशा अकोल्याकडे; संशयित युवक चौकशीखाली !

---Advertisement---

अकोला (युवा क्रांती वृत्तसेवा): दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनसमोर उभ्या कारमध्ये १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटानंतर तपास यंत्रणांनी अकोला जिल्ह्यातील एका तरुणाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पिंजर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील या युवकावर संशय निर्माण झाल्याने अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची दहा तासांपेक्षा अधिक वेळ सखोल चौकशी करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून या युवकावर काही दिवसांपासून गोपनीयरीत्या नजर ठेवण्यात येत होती. स्फोटाच्या दोन दिवस आधी तो अचानक अकोल्यातून गायब झाला. विशेष म्हणजे, स्फोट घडलेल्या दिवशी त्याचे मोबाईल लोकेशन दिल्ली परिसरात असल्याचे तांत्रिक तपासात आढळून आल्यानंतर संशय आणखी गडद झाला.

या धाग्यांच्या आधारे अधीक्षक चांडक यांनी स्वतः विविध तांत्रिक पद्धतींचा वापर करून युवकाचा मागोवा घेतला. अखेर गुप्त माहितीच्या आधारावर त्याला शोधून ताब्यात घेण्यात आले आणि त्याची चौकशी सुरू झाली. चौकशीवेळी तो दिल्लीमध्ये उपस्थित होता का, त्याचे तेथील संपर्क कोणाशी होते, तसेच स्फोटाशी त्याचा काही संबंध आहे का, याची पोलिसांकडून छाननी सुरू आहे.

दरम्यान, त्या युवकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) मागवून त्याचे संपर्क जाळे, हालचाली आणि संभाषणांचा सखोल अभ्यास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. तपासात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment