---Advertisement---

काटेल येथे दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा व मार्गदर्शन शिबिर!!

---Advertisement---

काटेल (युवा क्रांती वृत्तसेवा): दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक समरसता व मार्गदर्शनाचा उद्देश ठेवून दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा व दिव्यांगांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे ठिकाण श्री संत गजानन महाराज संस्थान, कोटेश्वरधाम, ता. संग्रामपूर जि. बुलढाणा येथे आहे.

या मेळाव्यात अंध, मूकबधिर व अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांना एकमेकांचा परिचय करून देणे, विवाहासाठी योग्य जुळणी करणे तसेच त्यांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करणे हा मुख्य उद्देश आहे. दिव्यांगांसाठी सामाजिक आधार निर्माण व्हावा आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राधेश्यामाजी चांडक राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. संजयजी कुटे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किरण पाटीलरामेश्वर कलंत्री यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (महाराष्ट्र), बुलढाणा यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी पुढाकार घेत असून दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment