एकफळ (युवा क्रांती वृत्तसेवा): हिंदू नववर्ष, चैत्र नवरात्री व गुढीपाडवा या पावन पर्वानिमित्त एकफळ येथील श्री विंध्याचल माता मंदिर परिसरात संगीतमय श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा ज्ञानयज्ञ 19 मार्चपासून सुरू होऊन 25 मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
या ज्ञानयज्ञात कथा व्यास म्हणून उज्ज्वल कृष्ण महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथामृताचे रसग्रहण भाविकांना अनुभवता येणार आहे.
📅 कार्यक्रमाचे दिवसनिहाय स्वरूप
- 19 मार्च : श्रीमद्भागवत महात्म्य व मंगलाचरण
- 20 मार्च : नारद-व्यासी संवाद व पांडव चरित्र
- 21 मार्च : कपीळ देवहूती संवाद व सती चरित्र
- 22 मार्च : वामन अवतार, श्रीराम जन्म व श्रीकृष्ण जन्मोत्सव
- 23 मार्च : श्रीकृष्ण बाललीला व गोवर्धन पूजा
- 24 मार्च : महारास कथा व श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह सोहळा
- 25 मार्च : सुदामा चरित्र, परीक्षित मोक्ष व हवनपूजन
🙏 महाप्रसादाचे आयोजन
ज्ञानयज्ञाची सांगता झाल्यानंतर 26 मार्च रोजी दुपारी महाप्रसादीचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🏛️ आयोजन
हा संपूर्ण कार्यक्रम श्री विंध्याचल माता मंदिर ट्रस्ट, एकफळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.








