जळगांव जामोद (आकाश बोरसे) : शहरातील गोविंद पुरा येथील सौरभ तायडे यांच्या घरामध्ये मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास मोठा साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तत्काळ जळगांव शहरातील सर्पमित्र अभिजीत तायडे व शरद जाधव यांना पाचारण करण्यात आले.
घटनेस्थळी पोहोचल्यानंतर सर्पमित्र शरद जाधव यांनी तो अति विषारी कोब्रा असल्याची ओळख पटवली. त्यानंतर दोन्ही सर्पमित्रांनी मोठ्या कौशल्याने आणि शांततेने कोब्रा साप सुरक्षितरीत्या ताब्यात घेतला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या तात्काळ मदतीबद्दल दोन्ही सर्पमित्रांचे मनःपूर्वक आभार मानले.
यानंतर रात्री १ : ३० वाजताच्या सुमारास सापाला मानवी वस्तीपासून दूर जंगलात सोडून त्याला जीवनदान देण्यात आले.
(युवा क्रांती वृत्तसेवा)










