---Advertisement---

जळगाव जामोद येथे जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मेळावा; जनजागृतीवर भर!!

---Advertisement---

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : दि. 30 मार्चजळगाव जामोद तहसील पुरवठा विभाग व ग्राहक पंचायत जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध घटकांच्या उपस्थितीत ग्राहक मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

📌 विविध घटकांची उपस्थिती

या कार्यक्रमाला:

  • व्यापारी
  • स्वस्त धान्य दुकानदार
  • शेतकरी
  • शासकीय अधिकारी व कर्मचारी
  • ग्राहक वर्ग व नागरिक

यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमातून ग्राहक हक्क व जबाबदाऱ्यांविषयी जनजागृती करण्यात आली.

🎤 मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार वसंतराव पारस्कर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून:

  • डॉ. सतीश नेवे (अध्यक्ष, ग्राहक पंचायत)
  • अ‍ॅड. मारोडे (मार्गदर्शक)
  • मिलिंद जोशी (नगरसंघ चालक)
  • सुधीर गायकवाड (पुरवठा विभाग प्रमुख)

मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष पारस्कर यांचे स्वागत स्वस्त धान्य दुकानदार किशोर दाताळकर यांच्या हस्ते करण्यात आली.

📢 ग्राहक हक्कांवर मार्गदर्शन

यानंतर अ‍ॅड. मारोडे यांनी ग्राहक पंचायतची संकल्पना, भूमिका आणि जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

👥 विशेष उपस्थिती

या कार्यक्रमात अनिताताई जैस्वाल, मीनाताई डिडोळकर, मधुस्मिता जोशी, परेश भन्साली, हेमंत जैन, शरद डोंगरे, प्रदीप बोबडे, आकाश ओवाळे, जितेंद्र जयस्वाल, विक्रम भन्साली, संजय अग्रवाल आदींची विशेष उपस्थिती होती.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment