---Advertisement---

लोकांना चांगली सेवा देवून जिल्ह्याचे नावलौकिक करा; सहपालकमंत्री सावकारे

---Advertisement---

१८६ अनुकंपा व ७१ एमपीएससी उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

जळगांव (युवा क्रांती वृतसेवा): जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना त्यांनी समाजसेवेतून जिल्ह्याचे नाव उज्वल करावे, असे आवाहन जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी १८६ अनुकंपा व ७१ एमपीएससी उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप वनसंरक्षक सरोज गवस, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, माजी आमदार विजयराज शिंदे आदी उपस्थित होते.

सहपालकमंत्री सावकारे म्हणाले, “नव नियुक्त कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडावीत. चांगले काम करणाऱ्यांना सदैव चांगल्या संधी उपलब्ध होत असतात. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठीही आपण सक्रिय भूमिका घ्यावी.” तसेच, पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार आणि आर्थिक वाढीस चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी, “प्रत्येक कर्मचाऱ्याने ही जबाबदारी ही केवळ नोकरी नाही तर जनतेच्या सेवेसाठीची संधी समजून पारदर्शक आणि गतिमान कार्यपद्धतीने काम करावे,” असे आवाहन केले. त्यांनी माहिती दिली की, अनुकंपा अंतर्गत ड वर्गाची प्रतीक्षा यादी पूर्णपणे निकाली काढण्यात आली असून क वर्गाच्या नियुक्त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील. सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना लवकरच एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या उमेदवारांची नियुक्ती राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये – ग्रामविकास, पोलीस, नगरपरिषद यांसारख्या कार्यालयांमध्ये करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सदाशिव शेलार यांनी केले, तर आभारप्रदर्शन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment