---Advertisement---

Dr. Mohan Bhagwat Shegaon Visit: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या दौऱ्यापूर्वी शेगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांची रंगीत तालीम!!

---Advertisement---

शेगाव (डी ललित) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटे शेगाव रेल्वे स्थानकावर पोलिस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम (Mock Drill) घेतली.

सकाळी सुमारे ५.४० वाजता मुंबई–हावडा मेल (क्र. १२८०९) या रेल्वेगाडीवर सुरक्षा सराव करण्यात आला. या रंगीत तालीमेत व्हीआयपी सुरक्षा, रेल्वे स्थानक परिसरातील हालचाली, सुरक्षा तपासणी, बंदोबस्ताची मांडणी तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा सराव करण्यात आला. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली.

या सरावावेळी पोलिस अधीक्षक नितीन तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी थोत्रे व प्रदीप पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, शासकीय रेल्वे पोलिस तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बंदोबस्तासाठी CISF चे १३ जवान आणि जिल्हा पोलिस दलातील १९१ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

माहितीनुसार, डॉ. मोहन भागवत हे शुक्रवारी शेगाव येथे आगमन करून एका परिचितांच्या निवासस्थानी अल्प विश्रांती घेतील. त्यानंतर ते श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन खामगाव येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहर आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment