---Advertisement---

जळगाव जामोद पोलीस ठाण्यात नितीन पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !

---Advertisement---

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार नितीन पाटील यांच्या पदग्रहणानिमित्त त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती, संग्रामपूरचे सभापती तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊराव पाटील, परमेश्वर गायकी, आकाश बोरसे यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

ठाणेदार पाटील यांनी या भेटीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी योग्य ती कामे प्राधान्याने करण्यात येतील, असे आश्वासन दिले. उपस्थित मान्यवरांनी नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत उत्तम कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

या स्वागत प्रसंगी स्थानिक कार्यकर्त्यांसह पोलीस दलाचे कर्मचारी उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment