---Advertisement---

खेर्डा कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर यशस्वी!

खेर्डा कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
---Advertisement---

जळगांव जामोद(युवा क्रांती वृत्तसेवा) : संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, खेर्डा यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दत्तग्राम वडशिंगी येथे उत्साहात पार पडले.

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देत विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबिर, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, सामाजिक एकोपा, स्वच्छता अभियान आदी उपक्रमांमुळे शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

शिबिराला राष्ट्रीय सेवा योजना, बुलढाणा जिल्हा समन्वयक प्रा. नीलकंठ राठोड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रसिद्ध साहित्यिक सागर झणके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत समाजभान, मूल्यशिक्षण व सुसंस्कृत नागरिक घडविण्याबाबत मोलाचे विचार मांडले. या शिबिरातून जबाबदार आणि संवेदनशील नागरिक घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या सात दिवशीय शिबिरादरम्यान विविध मान्यवरांनी भेट दिली. त्यामध्ये अविनाश उमरकर, संजय उमरकर, ज्ञानेश्वर उमरकर, सरपंच शितलताई वानखडे, सुनील वानखडे, प्राचार्य बोंबटकार, मुख्याध्यापक पालकर, धर्माळ सर, मधुकर भगत, राजेश वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

शिबिराचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment