---Advertisement---

खांडवी फाट्यावर प्रतिबंधित गुटखा विक्रीवर ठाणेदार पाटील यांची कारवाई !

---Advertisement---

जळगांव जामोद (आकाश बोरसे) : जळगांव जामोद तालुक्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा निर्धार करत ठाणेदार नितीन पाटील यांनी सलग मोहिम राबविल्यानंतर तालुक्यातील अवैध व्यवहारांमध्ये मोठी घट दिसून येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून 1 डिसेंबर रोजी तालुक्यातील नांदुरा रोडवरील खांडवी फाट्यानजीक प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची अवैध विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे ठाणेदार पाटील यांनी पीएसआय नागेश खाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार, हेडकॉन्स्टेबल निलेश पुंडे तसेच पोलिस कॉन्स्टेबल सचिन राजपूत व सचिन शेळके यांच्या समवेत धाड टाकली. कारवाईदरम्यान आरोपी ऋषिकेश दिलीप गांधी (वय 24, रा. पिंपळगाव काळे) याला प्रतिबंधित विमल पान मसाला वाहतूक करताना अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपीकडून मोटरसायकल, मोबाईल व प्रतिबंधित गुटखा असा एकूण 2 लाख 35 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे (वय 51) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नागेश खाडे व हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार करीत आहेत. अवैध धंद्यांवर पोलिसांचे हे सातत्यपूर्ण पथक-कारभार कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment