---Advertisement---

राज्यस्तरीय लघूपट स्पर्धेत दिप्तेश सोनवणे यांचा प्रथम क्रमांक!

---Advertisement---

जळगाव जा.(युवा क्रांती वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला संगम आयोजित राज्यस्तरीय लघूपट स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थी दिप्तेश सोनवणे यांचा ‘निसर्ग आणि आदिवासी’ लघूपट प्रथम क्रमांकाने निवडला.

नागपूर येथील भगवान बिरसा मुंडा 150 वी जयंती व जनजातीय गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आदिवासी मंत्री डॉ. भारती पवार आणि आदिवासी मंत्री अशोक उइके यांच्या उपस्थितीत दिप्तेश यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व तीन लाखांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी विद्यापीठात प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी दिप्तेश यांचा सत्कार केला. कार्यक्रमास प्रा. राम भावसार, डॉ. गोपी सोरडे, प्रा. रोहित देशमुख, प्रदीप भोई, शितल नेवे, हेमंत सोनवणे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment