शेगांव (डी ललित) : शेगांव शहरात बुधवारी (दि. 11 मार्च 2026) सायंकाळी झालेल्या अपघातात एका 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगांव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहम दिलीप शेगोकार (वय 30, रा. जावाड नगर, शेगांव ) यांचा अपघात ओकार हॉटेल जवळ, शेगांव येथे दि. 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी अंदाजे 6.50 वाजण्यापूर्वी झाला. अपघातानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या संदर्भात डॉ. सुनिल देशमुख यांच्या सहीने कक्षसेवक राजू माणिक एकाडे (रा. समोसारू, शेगाव) यांनी लेखी मेमो क्र. 2902 पोलीस स्टेशनला सादर केला. मेमोच्या आधारे शेगाव शहर पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक 09/2026, कलम 194 BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
सदर प्रकरणात पोहेका. सुनील सुसर (ब.न. 1092) यांनी नोंद केली असून पुढील तपास पोहेका. सुरेंद्र चव्हाण (ब.न. 1694) करीत आहेत. मृतदेहाचे पुढील कायदेशीर प्रक्रिया व शवविच्छेदन करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. (युवा क्रांती वृत्तसेवा)







