---Advertisement---

शेगांव बसस्थानकावर कॉलेज युवतीचा छळ; आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. ७ एप्रिल रोजी शेगांव शहरातील बसस्थानक परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजमधून घरी परतत असताना एका युवतीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती आपल्या मैत्रिणीसोबत वरूडला जाणाऱ्या बसची वाट पाहत शेगांव बस स्थानक येथे उभी होती. याच दरम्यान वरूड येथील पवन पंजाबराव इंगळे हा युवक त्यांच्या जवळ आला. त्याने वाईट उद्देशाने युवतीचा हात धरून दाबल्याची गंभीर घटना घडली. ही घटना दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली.

पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास स. पो. नि. गजानन सोनटक्के हे पो. नि. निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

⚠️ पोलिसांचा इशारा

गर्दीच्या ठिकाणी महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, जर कोणी गर्दीच्या ठिकाणी मुलींना / महिलांना त्रास दिला तर कुठल्याही प्रकारची मुलाहिजा करण्यात येणार नाही अशी सक्त ताकीद स. पो. नि. गजानन सोनटक्के यांनी दिली आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही पोलिश प्रशासना कडून सक्त ताकीद देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment