शेगांव (डी ललित): प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा-२) २०२४-२५ व २०२५-२६ अंतर्गत शेगाव पंचायत समितीला देण्यात आलेल्या २०९२ घरकुलांच्या उद्दिष्टाची १००% प्रशासकीय मंजुरी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी गट विकास अधिकारी श्री. चंदनसिंग सी. राजपूत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली साध्य झाली आहे.
या प्रक्रियेत नियोजनातील अचूकता, वेळोवेळी आढावा, प्रभावी समन्वय आणि काटेकोर अंमलबजावणी यांचा उत्कृष्ट संगम दिसून आला. शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करत ही प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्यात आली आहे.
📌 प्रशासनाचा आदर्श ठरलेले नेतृत्व
श्री. चंदनसिंग सी. राजपूत यांच्या कार्यतत्परतेमुळे शेगांव तालुक्याच्या विकासाला गती मिळाली असून, त्यांच्या कामाची शैली प्रशासनासाठी आदर्शवत मानली जात आहे.
👉 “नियोजनातील अचूकता आणि अंमलबजावणीतील पारदर्शकता ही आपल्या कामाची खरी ओळख आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.
👉 “एक कार्यक्षम अधिकारी कसा असावा, याचे आपण उत्तम उदाहरण आहात,” असेही गौरवोद्गार काढण्यात आले.
🚀 विकास प्रकल्पांना मिळाली नवी दिशा
श्री. राजपूत यांच्या कार्यकाळात शेगांव तालुक्यात विविध विकास प्रकल्प राबविण्यात आले असून, त्यातून ग्रामीण भागात सकारात्मक बदल दिसून येत आहे.
कठीण परिस्थितीतही संयम आणि कौशल्याने प्रशासन चालवण्याची त्यांची शैली विशेष कौतुकास्पद ठरली आहे.
🏆 टीमवर्कचे यश
या यशात पंचायत समितीच्या संपूर्ण घरकुल टीमचा मोलाचा वाटा आहे. सर्व लाभार्थ्यांना वेळेत मंजुरी देऊन शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात यश आले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








