---Advertisement---

शेगांवात अल्पवयीन मुलीचा पाठलाग, धमक्या; पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगांव | (डी ललित): शेगांव शहरातील सिद्धेश्वर नगर परिसरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय 42, रा. सिद्धेश्वर नगर, गौलखेड रोड, शेगांव) यांच्या तक्रारीवरून आरोपी ऋषिकेश बोबडे व त्याचे दोन साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक 1 हा पीडित अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता. तसेच “माझ्याशी बोलली नाहीस तर तुला व तुझ्या लहान भावाला ठार मारेल” अशा प्रकारच्या गंभीर धमक्या देत होता. एवढेच नव्हे तर आरोपींनी पीडितेच्या घरासमोर जाऊन तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही समोर आले आहे.

ही घटना जानेवारी 2025 पासून ते 14 मार्च 2026 पर्यंत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर प्रकरणी अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 75, 78, 333, 351(2), 352 तसेच पोक्सो कायदा कलम 12 आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 3(i)(w)(i)(ii), 3(2)(VA) लागू करण्यात आले आहेत.

या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील (SDPO, खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्यांना पोलीस अधिकारी निमिष मेहेत्रे यांची साथ आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

🔎 प्रकरणाचा आढावा

  • अपराध क्रमांक: 167/2026
  • घटनाकालावधी: जानेवारी 2025 ते 14 मार्च 2026
  • दाखल तारीख: 18 मार्च 2026
  • ठिकाण: सिद्धेश्वर नगर, गौलखेड रोड, शेगांव
  • आरोपी: ऋषिकेश बोबडे व दोन साथीदार
  • लागू कायदे: BNS, पोक्सो, अ.जा./ज. अत्याचार प्रतिबंधक कायदा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment