शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. 5 एप्रिल 2026 ला शहरातील सांप्रदाय नगर परिसरात मतदार यादी तपासणीसाठी आयोजित करण्यात आलेला एस.आय.आर. (Special Intensive Revision) कॅम्प उत्साहात पार पडला. श्री हनुमान संस्थान येथे सकाळी 9 ते 12 या वेळेत या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
एस.आय.आर. प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक मतदाराची पडताळणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सोयीस्कर ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता.
या कॅम्पला नगर परिषद शेगांवचे बांधकाम सभापती अंकुशभाऊ विजय बाप्पू देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधत एस.आय.आर. प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. यावेळी पुंजाजी कोल्हे (सुपरवायझर), नितीन बावणे (बीएलओ) व भारसाकडे (बीएलओ) यांना कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला विलास सुलताने, संतोष यादगिरे, संतोष श्रीनाथ, अनिल अरुडकर, ज्ञानेश्वर पिसे, रवि चौधरी, भागवत सुलताने यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या मतदार नोंदींची पडताळणी केली.
📌 एस.आय.आर. कॅम्पचे महत्त्व
मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी आणि चुकीची नावे वगळून अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी एस.आय.आर. मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या माध्यमातून नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सुलभता मिळते.









