---Advertisement---

‘शिवसृष्टी’च्या उभारणीसाठी आमदार डॉ. संजय कुटे यांची पुढाकारात्मक पाऊल !

---Advertisement---

जळगांव जामोद (युवा क्रांती वृत्तसेवा) : छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत जळगांव जामोद शहरातील तहसील परिसरातील जागेची आमदार डॉ. संजय कुटे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी लगतच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरालाही भेट देऊन नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांची भव्य उभारणी करून, ऐतिहासिक वैभव आणि संस्कृती जपणारी ‘शिवसृष्टी’ निर्माण करण्याच्या दृष्टीने जागा, निधी, रचना आणि प्रकल्पाच्या बांधकामाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तातडीने तयार करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार डॉ. संजय कुटे यांनी संबंधित विभागास दिल्या. तसेच, DPR नियमानुसार सादर करून पुढील कार्यवाही गतीने करण्याच्या देखील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

‘शिवसृष्टी’च्या माध्यमातून छत्रपतींचे पराक्रम, शौर्य आणि संस्कृती भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार असून, हा प्रकल्प जळगांव जामोद शहराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव अधिक वृद्धिंगत करेल, असा विश्वास आमदार डॉ. कुटे यांनी यावेळी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment