कोलकाता (युवा क्रांती वृतसेवा) : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवत भाजप नेते सुवेन्धू अधिकारी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बंगालमध्ये हा मोठा राजकीय बदल मानला जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का देत भाजपने सत्ता स्थापन केली आहे.
राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या शपथविधी सोहळ्यात सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजप कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष साजरा करत विजयाचा आनंद व्यक्त केला. अनेक वर्षांपासून तृणमूल काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ता मिळवणे हे राष्ट्रीय राजकारणातील मोठे परिवर्तन मानले जात आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राज्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. तसेच भ्रष्टाचारमुक्त आणि जनतेच्या विश्वासावर आधारित प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला.








