---Advertisement---

दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड ऑनलाइन करणे बंधनकारक; प्रशासनाचे निर्देश!!

---Advertisement---

खामगाव(डी ललित): विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID (Unique Disability ID) कार्ड जमा करणे तसेच ऑफलाइन असलेले दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाइन करणे आवश्यक असल्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

नायब तहसीलदार संजय गांधी योजना विभाग, खामगाव यांच्या कार्यालयातून ५ मार्च २०२६ रोजी याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्देशानुसार विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणी करून त्यांचे UDID प्रमाणपत्र ऑनलाइन स्वरूपात तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र आहे, त्यांनी ते ऑनलाइन UDID प्रणालीमध्ये नोंदणी करून डिजिटल प्रमाणपत्र तयार करून घ्यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी गावातील सेतू केंद्र चालकांची मदत घेऊन लाभार्थ्यांनी नोंदणी व प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच “विकसित शिवाजी महाराज महाआरोग्य समाधान शिबिर” अभियानांतर्गत नागरिकांना याबाबत माहिती देऊन अधिकाधिक दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID प्रमाणपत्र ऑनलाइन तयार करून घेण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑनलाइन झालेले UDID कार्डची झेरॉक्स प्रत संजय गांधी विभागात जमा करणे आवश्यक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment