---Advertisement---

शेगांवात‘विश्व मांगल्य मातृसंस्कार समागम’ निमित्त पत्रकार परिषद; 28-29 मार्चला भव्य संमेलनाची घोषणा!!

---Advertisement---

शेगांव (डी ललित): विश्व मांगल्य सभा शाखा शेगांव यांच्या वतीने ‘विश्व मांगल्य मातृसंस्कार समागम’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद मंगळवार, दिनांक 24 मार्च रोजी दुपारी ठीक 3:00 वाजता यादव बेकरी येथे पार पडणार आहे.

येत्या 28 व 29 मार्च रोजी शेगांव शहरात पश्चिम विदर्भ प्रांतस्तरीय भव्य मातृसंस्कार समागमाचे आयोजन करण्यात आले असून, या संमेलनामध्ये मातृशक्ती, संस्कार आणि समाजजागृती या विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या पत्रकार परिषदेस प्रमुख उपस्थिती म्हणून
👉 विश्व मांगल्य विदर्भ प्रांत अध्यक्षा सौ. मधुराताई लेंधे
👉 पश्चिम विदर्भ प्रांत संयोजिका व जनसंपर्क प्रतिनिधी सौ. अपर्णाताई कुटे

यांची उपस्थिती राहणार आहे.

तसेच, या कार्यक्रमाचे आयोजन विश्व मांगल्य सभा शाखा शेगाव यांच्या अध्यक्ष सौ. अंजलीताई जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेस सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment