---Advertisement---

मन नदीला आला पूर – पुलावरून वाहू लागले पाणी, लोहारा गावाचा रस्ता ठप्प!

---Advertisement---

📰 युवा क्रांती न्यूज | दिनांक: 22 जुलै 2025
📍 गाव: लोहारा, तहसील: बाळापूर, जिल्हा: अकोला

अकोला : संतनगरी शेगावपासून केवळ 9 किमी अंतरावर असलेल्या अकोला जिल्ह्यातील लोहारा गावात आज सकाळपासून मन नदीला पूर आला असून, नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने संपूर्ण रस्ता ठप्प झाला आहे.
गावातील नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, शेकडो वाहनांना थांबावं लागलं आहे. शेगावला जाणारे भाविक भक्त अडकले असून, मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या यात्रेकरूंच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला आहे.

● नवीन पुलाचं काम अजूनही अपूर्ण – प्रशासनाचा उदासीनपणा

मन नदीवर नवीन पुलाचं काम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु आहे, मात्र आजपर्यंत ते पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे पावसाळ्यात जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले की, गावाचा संपर्क तुटतो. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणीही योग्य ती कार्यवाही झाली नाही.

● स्थानिकांचा संताप – वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता!

जर वेळीच नवीन पुलाचं काम पूर्ण केलं नाही, तर यापुढे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे गावातील युवा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी ‘युवा क्रांती न्युज’ च्या टीम सांगितले.

🗣️ युवा क्रांती न्यूज आपल्या प्रश्नांना वाचा देत राहील!
✍️ युवा क्रांती न्यूज टीम
📅 दिनांक: 22/07/2025

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment