---Advertisement---

Shegaon Crime: पारीजात नगरातील बंद घर फोडून चोरी; सोन्याचे दागिने, रोकडसह ₹58 हजारांचा ऐवज लंपास!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) – शेगाव शहरातील पारीजात नगर, एसबीआय कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 58 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप रामदास परळीकर (वय 58) हे 30 जुलै 2026 रोजी दुपारी पत्नीसह खामगाव येथे मित्राच्या घरी गेले होते. घराला व कंपाऊंड गेटला कुलूप लावून ते बाहेर गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर कंपाऊंड गेट उघडून आत गेल्यावर घराच्या मुख्य दरवाज्याचे आणि ग्रिल गेटचे कुलूप तुटलेले दिसले.

घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी कपाट आणि त्यावरील लॉकर फोडलेले आढळले. तपासणी केली असता सुमारे 50 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, 3.5 ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, चांदीच्या तोरड्यांची जोडी, चांदीचे दोन करंडे, गणपतीची चांदीची मूर्ती, ₹6 हजारांची रोकड तसेच टायटन कंपनीची दोन घड्याळे असा एकूण ₹58 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305 व 331(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment