बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा): माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे आज ‘सद्भावना दिवस’ साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिवसाची शपथ दिली.

शपथेत सर्व धर्म, जात, भाषा व प्रांतातील लोकांमध्ये सद्भावना, सहिष्णुता आणि ऐक्य राखण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. समाजात सौहार्द निर्माण व्हावे, विविधतेत एकता टिकावी यासाठी सद्भावना दिवसाचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे यावेळी डॉ. पाटील यांनी सांगितले. संपूर्ण देशभरात राजीव गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.










