पहुरपूर्ना येथे अंगणवाडीतील चिमुकल्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप; सेविका-मदतनीसांचा सत्कार!
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 28 सप्टेंबर – रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पहुरपूर्णा येथे ‘आंगण का मिलन’ हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडीतील चिमुकल्यांप्रती प्रेम आणि आपुलकी व्यक्त करत त्यांना भेटवस्तू तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांना फराळाचे वाटप करून पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. बालकांच्या संगोपनासोबतच त्यांच्या प्राथमिक शिक्षणात अंगणवाडी सेविका व मदतनीस बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे उपस्थितांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाला सौ. अपर्णाताई कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या संयोजिका भाजपा जिल्हा सचिव सौ. स्वाती विजय यादव, भाजपा जिल्हा सचिव सौ. शीतल प्रकाश निकम, भाजपा शेगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष सौ. रूपालीताई अनंत बरडे तसेच भाजपा महिला मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजिका सौ. चेतना गजानन खेते यांची यावेळी उपस्थिती होती.
‘आंगण का मिलन’ उपक्रमामुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर सेविका व मदतनीसांच्या कार्याचा सन्मानही करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आयोजकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻








