शेगांव (युवा क्रांती वृतसेवा): शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनुसार माजी आमदार अभिजित आडसुळ आणि युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव यांच्या उपस्थितीत जळगाव जामोद मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक विश्राम भवन, शेगाव येथे पार पडली.
या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांतील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी उबाठा गटाचे माजी तालुकाध्यक्ष दत्ता पाटील वाघमारे आणि माजी शाखाप्रमुख मारुती पाटील लांजुळकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रभावी रणनीती आखण्यात आली असून येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना संघटित पद्धतीने उतरून यश मिळवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील मिरगे, तालुकाप्रमुख रामा पाटील थारकर, शहरप्रमुख संतोष लिप्ते, उपजिल्हाप्रमुख (किसान सेना) पवन बारिंगे, महिला जिल्हाप्रमुख शारदा पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख मंगलाताई काकड, तालुकाप्रमुख मयुरी ताई शेजोळे, उपतालुकाप्रमुख आशिष मिरगे, अमोल मुंडाले, मोहन लांजुळकर, विठ्ठल पाटील, अमोल जवंजाळ, ज्ञानेश्र्वर दळी, महेश पहुरकार आदींसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, शाखाप्रमुख व बूथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.











