---Advertisement---

कोकणात राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ? गुप्त बैठकांचा सपाटा

---Advertisement---

 रत्नागिरी (युवा क्रांती वृतसेवा) : मागील काही दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली खेड मतदारसंघ चर्चेत आहे. खेड येथील माजी नगराध्यक्ष आणि मनसेतून निलंबित झालेले वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असला तरी तो तूर्तास पुढे ढकलला गेला आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक युवा नेता महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा दापोलीत रंगल्या आहेत. दापोली, खेड,मंडणगड विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा एक युवा नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटत असून कोणता झेंडा घेऊ हाती, या विचारात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दिवाळीआधीच हे राजकीय फटाके फुटणार असल्याचंही बोललं जात आहे.

ऑपरेशन लोटस की ऑपरेशन टायगर?

सूत्रांच्या माहितीनुसार, काही जण आधीच गुप्त बैठका घेत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून डावपेच आखले जात आहेत. दापोलीतल्या राजकारणात आतापर्यंत शांत बसलेले अनेक चेहरे अचानक राजकीय रंगमंचावर दिसू लागले तर नवल वाटू नये.

दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघात पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले माजी आमदार संजय कदम यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर आता आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचीही चर्चा आहे. संजय कदम यांच्या प्रवेशानंतर दापोली नगरपंचायतीमधील काही नगरसेवकांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. काही नगरसेवक शिवसेनेत आले आहेत. पण अलीकडेच ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्ष ममता मोरे यांनी वाढदिवसाला ठाकरे गटाचे नेते अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा फोटो सोशल मीडियावर टाकल्याने याबाबतही उलट सुलट राजकीय चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दापोलीतील मोठ्या पदावर असलेला युवा नेता सध्या पक्षात अस्वस्थ असून त्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांबरोबर काही गुप्त बैठका केल्याची माहिती आहे. या युवा नेत्याच्या यापूर्वीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबरही काही बैठका झाल्या आहेत. मात्र भविष्यातील राजकीय वाटचाल शिवसेना की भाजप असणार, हा निर्णय अद्याप झालेला नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment