---Advertisement---

शेगांव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्यास राष्ट्रपतींना निमंत्रण…

---Advertisement---

शेगांव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु यांना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सस्नेह निमंत्रण दिले

बुलढाणा (आकाश बोरसे): संतनगरी शेगांव येथे नोव्हेंबर 2025 मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनासाठी भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु यांना केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राष्ट्रपती भवन येथे सस्नेह निमंत्रण दिले. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी या पारंपरिक आरोग्य पद्धतींचा प्रसार, संशोधन व जनकल्याण यासाठी हा मेळावा आयोजित केला जात आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, संत गजानन महाराज आणि लोणार सरोवरासारख्या ऐतिहासिक व नैसर्गिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात हा सोहळा होणार असून, राष्ट्रपतींच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment