बुलढाणा (आकाश बोरसे) : दत्तपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाड्याला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व निराकरण केले. शिव/पाणंद रस्त्याचे सर्वेक्षण, जिवंत ७/१२ मोहिमेची माहिती तसेच घरकुलाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेला साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांनी शासकीय योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, आरोग्य विभागाचे अधिकारी व गावकरी उपस्थित होते. (युवा क्रांती वृतसेवा)










