---Advertisement---

“रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम”

---Advertisement---

संग्रामपूर (आकाश बोरसे) : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रामपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

रवींद्रजींचे सद्गुणी नेतृत्व, जनतेसाठी अखंड झटणारा स्वभाव आणि कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देणारी वृत्ती यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकुशलतेतून व विकासाभिमुख दृष्टिकोनातून समाजजीवनात वेगळी छाप पडली आहे.

त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरवट बकाल येथील उपबाजार परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाऊराव अवचार (पाटील), कृ. उ. बा. स. सभापती आणि संग्रामपूर तालुकाध्यक्ष उपस्थित होते. (युवा क्रांती वृसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment