संग्रामपूर (आकाश बोरसे ) : कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर व उपबाजार समिती वरवट बकाल येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नवीन सोयाबीन विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी सोयाबीनला राठी टेंडर्सचे मालक गोलूशेठ राठी व लोकेशन राठी यांनी प्रती क्विंटल ४००१ रुपये असा प्रारंभीचा दर जाहीर केला.

याप्रसंगी शेतकरी संजय रामेश्वर गवई (निवाणा) यांचा शाल, श्रीफळ व शेला-टोपी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नारळ फोडून या नवीन हंगामाची सुरुवात करण्यात आली.
समितीचे कर्मचारी टिकर साहेब, मापारी वर्गातील दिनेश राठी, बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, व्यापारी वर्ग व हमाल मापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की सुरू झालेल्या या दराचा लाभ सर्वांना मिळावा व यावर्षी सोयाबीनला चांगले दर मिळावेत. (युवा क्रांती वृतसेवा)











