---Advertisement---

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज!

---Advertisement---

दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई (युवा क्रांती वृतसेवा): राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी पुन्हा उभा राहावा, यासाठी सरकारकडून जास्तीत जास्त मदत दिली जाईल. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.”

मदतीचे दर प्रति हेक्टर

कोरडवाहू शेती: ₹१८,५००

हंगामी बागायती: ₹२७,०००

बागायती शेती: ₹३२,५००

राज्यातील २९ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाल्याने सर्व भागांत सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

खरडून गेलेल्या जमिनीसाठी मदत

अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना ₹४७,००० प्रति हेक्टर आणि नरेगा योजनेतून ₹३ लाखांपर्यंतची मदत दिली जाईल. विहिरीतील गाळ काढण्यासाठी ₹३०,००० प्रति विहीर तर कुक्कुटपालन शेतकऱ्यांना ₹१०० प्रति कोंबडी अशी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “पीक नुकसानीसाठी १८ हजार कोटींहून अधिक रक्कम वितरित केली जाणार असून, नियमात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना CSR च्या माध्यमातून मदत केली जाईल.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment