---Advertisement---

ज्ञानेश्वरी नगरात 12 फूट अजगराने माजवली खळबळ !

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहरातील ज्ञानेश्वरी नगर, अकोट रोड परिसरात तब्बल 12 फूट लांबीचा अजगर सापडल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी हा प्रचंड अजगर रस्त्याच्या कडेला हालचाल करताना पाहताच तत्काळ वनविभागाला कळविले.

नागरिकांच्या मदतीने सर्पमित्र देवा भाऊ यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडले. या दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले होते. काहींनी या घटनेचे मोबाईलद्वारे चित्रीकरणही केले.

प्राथमिक अंदाजानुसार हा अजगर जवळच्या जंगल क्षेत्रातून भटकत येऊन निवासी भागात दाखल झाला असावा, अशी शक्यता वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पकडलेला अजगर पूर्णपणे निरोगी असून त्याला सुरक्षित ठिकाणी म्हणजेच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे कोणतीही हानी टळली आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये नागरिकांनी स्वतः प्रयत्न न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment