संग्रामपूर (आकाश बोरसे) – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने संग्रामपूर पंचायत समिती मतदारसंघातील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार विविध गटांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
१️. पळशी – झाशी (नागरिक मागास प्रवर्ग) महिला
२️. कवठळ – अनुसूचित जाती
३️. टुनकी – अनुसूचित जमाती महिला
४️. बावनबिर – (नागरिक मागास प्रवर्ग)
५️. वानखेड – सर्वसाधारण महिला
६️. सोनाळा – सर्वसाधारण महिला
७️. वरवट बकाल – सर्वसाधारण
८️. पातुर्डा – सर्वसाधारण
या आरक्षण सोडतीनंतर आगामी निवडणुकीत विविध पक्ष व संभाव्य उमेदवारांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








