---Advertisement---

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी सिंदखेडराजा येथे विशेष नियोजन शिबिर संपन्न !

---Advertisement---

दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सज्ज !

सिंदखेडराजा (युवा क्रांती वृत्तसेवा) : ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ महिन्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयात एक दिवसीय विशेष नियोजन शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन मा. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालीतहसीलदार श्री. अजित दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. शिबिरात महसूल, कृषी व ग्रामविकास या त्रिसूत्री यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार, कृषी मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश होता.

शिबिरातील महत्त्वाचे निर्णय:

  1. ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित मदत यादींचे तातडीने संकलन करण्यावर भर देण्यात आला.
  2. सप्टेंबर महिन्यातील बाधित गावांच्या याद्या तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
  3. तालुक्यातील ११० बाधित गावांपैकी ४७ गावांची मदत यादी शिबिरादरम्यान प्राप्त झाली.
  4. पुढील दोन दिवसांत उर्वरित गावांच्या याद्या पूर्ण करून दिवाळीपूर्वी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले.

या शिबिरामुळे विभागीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून मदत वाटपाची प्रक्रिया अधिक गतीने व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होईल, असा विश्वास तहसील प्रशासनाने व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment