---Advertisement---

मेहकर येथे आरोग्यरथाचे प्रतापराव जाधव यांच्या हस्ते लोकार्पण !

---Advertisement---

“रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा”

मेहकर (आकाश बोरसे) : नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात केंद्रीय आयुष व आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते एनसीडी आरोग्य तपासणी सुरक्षा रथ अंबुलन्सचे लोकार्पण करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत मागील चार महिन्यांत १० हजार नागरिकांची नेत्र व गैर-संसर्गजन्य आजारांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून ३,२०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप झाले आहे. पुढील १५ हजार नागरिकांपर्यंत तपासणीचा लाभ पोहोचविण्यासाठी हा आरोग्यरथ तालुक्यात भ्रमंती करणार आहे.

कार्यक्रमाला सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, शहरप्रमुख जयचंद बाढीया, दिलीपबापू देशमुख, योगेश जाधव, निरज रायमुलकर, आरोग्य अधिकारी, शिवसेना-युवासेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी प्रतापराव जाधव म्हणाले, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हे आपले कर्तव्य असून आरोग्यरथ हा उपक्रम मेहकर तालुक्यात आरोग्यजागृतीचा नवा टप्पा ठरेल.” नागरिकांनी या तपासणीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment