---Advertisement---

“शौर्याची ‘सिल्व्हर स्ट्राईक’! महाराष्ट्रच्या कन्येचा आशियाई मैदानावर विजय”

---Advertisement---

ठाणे (युवा क्रांती वृत्तसेवा): बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची कन्या शौर्या अंबुरे हिने १०० मीटर हर्डल्स (अडथळा शर्यत) स्पर्धेत रौप्य पदक जिंकत देशाचा आणि महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.

ठाणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या शौर्याने या स्पर्धेत १३.७३ सेकंदांचा वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या या पराक्रमामुळे भारतीय अॅथलेटिक्स क्षेत्रात एक नवी उर्जा निर्माण झाली आहे.

शौर्या सध्या एआयएम स्पोर्ट्स फाउंडेशन येथे प्रशिक्षक श्री. अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन हे घटक ठळकपणे जाणवतात.

शौर्याच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी व महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांचेही या यशात मोठे योगदान असून त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

शौर्या अंबुरे हिला पुढील काळात अधिकाधिक यश मिळो, ती भारताचे प्रतिनिधित्व करत आणखी नवे विक्रम प्रस्थापित करो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment