(युवा क्रांती वृतसेवा) : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधार कार्ड तयार केल्याच्या प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
भाजपाच्या सोशल मीडिया समन्वयकाने दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.










