बुलडाणा (आकाश बोरसे) : आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, प्रवक्त्या जयश्री शेळके, आमदार धीरज लिंगाडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार राजेश एकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, प्रसन्नजीत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, लक्ष्मण भुमरे, संतोष रायपुरे, डी.एस. लहाने, भास्करराव काळे, रमेश कांयदे, राजू पाटील आणि गजानन धांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत आगामी निवडणुकीसाठी पक्षनिहाय समन्वय, प्रचाराची रणनीती आणि आघाडीच्या उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. सर्वपक्षीय एकजुटीतून महाविकास आघाडी मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
(युवा क्रांती वृत्तसेवा )










