---Advertisement---

३० नोव्हेंबर २०२५ ला भव्य वातरोग शिबिराचे आयोजन!

---Advertisement---

शेगांव(युवा क्रांती वृत्तसेवा): नागपूर येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भव्य वातरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन येत्या रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर डॉ. ज्ञानेश्वर तायडे यांच्या संजीवनी हॉस्पिटल, गुरुदेव चौक, आठवडी बाजार, शेगाव येथे भरविण्यात येणार आहे.

या शिबिरात ऑपरेशन टाळण्यासाठी उपयुक्त अशा आयुर्वेदिक व पंचकर्म उपचारांबाबत मार्गदर्शन, तसेच डोळ्यांद्वारे हाडांची घनता (थिनसुलता) तपासणी बोन डेन्सिटीमीटर मशीनद्वारे निःशुल्क करण्यात येणार आहे.

वाताचे आजार, सर्व्हायकल-लंबर स्पॉन्डिलोसिस, स्नायूंचा दाब (Cord Compression), संधिवात, आमवात, गुढघेदुखी, पाठदुखी, मुरगाळणे, हाडे ठिसूळ होणे (Osteoporosis) अशा विविध आजारांवर तज्ज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन केले जाईल.

शिबिराचे मार्गदर्शक म्हणून डॉ. राजकुमार गुहा (M.D. Ayurved, Mumbai) — नागपूरचे प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ — तसेच डॉ. ज्ञानेश्वर बी. तायडे (B.A.M.S.), बालरोग, स्त्रीरोग व जनरल फिजिशियन उपस्थित राहणार आहेत.

शिबिराची वेळ दुपारी १२ ते ५ अशी असून नोंदणी शुल्क फक्त २० रुपये ठेवण्यात आले आहे. इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : ९६३७८७६६५८

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment