---Advertisement---

जळगाव जामोद नगरपरिषद निवडणूक 2025; 21 उमेदवारांची माघार!

---Advertisement---

जळगाव जामोद (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. ऐन थंडीतही निवडणूक प्रक्रियेमुळे वातावरण तापल्याचे दिसत आहे. 21 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अंतिम दिवशी एकूण 21 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून त्यात 4 नगराध्यक्ष पदाचे तर 17 नगरसेवक पदाचे उमेदवारांचा समावेश आहे.

नगराध्यक्ष पदाच्या लढतीतून शिवसेना (उ.बा.ठा) चे पवन गजानन अवचार, तसेच अपक्ष अजय पिराजी वानखडे, मंगेश रामेश्वर माटे आणि विजय रामनाथ तांदळे यांनी माघार जाहीर केली.

नगरसेवक पदासाठी काँग्रेस, शिवसेना (उ.बा.ठा) तसेच अपक्ष अशा विविध पक्षांचे 17 उमेदवार स्पर्धेतून बाहेर पडले. यामध्ये काँग्रेसचे अनिल इंगळे, माधुरी सावतकार, गोपाल कोथळकार, सय्यद हुसेन, समीना खान, शिवसेना (उ.बा.ठा) चे रमेश ताडे, पूजा वाघ, तसेच अपक्ष चे नागेश भटकर, निकिता वानखडे, सविता खिरोडकार, प्रेरणा सोनटक्के, पवन गोंड, संदीप मोरे, शेख सलीम, अनिल ढोकणे आदींचा समावेश आहे.

माघारीनंतर जळगाव जामोद नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत निश्चित झाली आहे. अंतिम मैदानात गजानन सूर्यवंशी (काँग्रेस), संजय पारवे (अपक्ष), गणेश दांडगे (भाजप), सुधीर पारवे (वंचित बहुजन आघाडी) हे उमेदवार आमनेसामने आहेत.

अंतिम माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, जळगाव जामोद येथील नगर परिषद निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment