शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगांव नगरपरिषद क्षेत्रात दीर्घकाळ विविध पक्षांमधून कार्यरत राहून समाजकारण, स्थानिक विकास आणि जनसंपर्काची निष्ठेने सेवा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

भाजपाच्या विकासाभिमुख विचारसरणीवर विश्वास ठेवत या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून, त्यांच्या प्रवेशामुळे शेगांव नगरपरिषद क्षेत्रातील भाजपाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असे आमदार डॉ. कुटे यांनी यावेळी सांगितले. नवीन कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे विकासकामांना नवे गतीमान मिळेल तसेच जनसेवेला अधिक बळकटी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजकारणाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले महेश कालोरे (अपक्ष उमेदवार) तसेच विनोद गणगणे, प्रवीण लहाने, उमेश खर्डे, अविनाश पोटदुखे, सचिन कलोरे, राहुल बकाले, रामेश्वर कलोरे, सुनील काठोळे, निलेश कलोरे, अनिल आसोलकर, गजानन बढे आणि प्रकाश कलोरे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेगांवमधील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे बदल होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.












