---Advertisement---

ठाण्यात पार्किंग वादातून तणाव; मनसे नेत्यांविषयी अयोग्य वक्तव्यांचा आरोप!

---Advertisement---

ठाणे (युवा क्रांती वृत्तसेवा) : मुंबई, ठाणे आणि राज्यातील काही ठिकाणी अलीकडे मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाची ठिणगी पडत असताना ठाण्यातील एक नवी घटना समोर आली आहे. पोखरण रोड क्रमांक २ वरील गांधीनगर परिसरात पार्किंगवरून झालेल्या किरकोळ वादाचे गंभीर रूपांतर झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात काही परप्रांतीय तरुणांनी दारूच्या नशेत मराठी तरुणाला धमक्या दिल्याचा आणि अर्वाच्य शिविगाळ केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वादादरम्यान संबंधित तरुणांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविषयी अत्यंत अवमानकारक, अयोग्य शब्दांचा वापर केला. परिसरातील एका मराठी युवकाला जबरदस्तीने हुसकावून लावल्याचेही आरोप पुढे आले आहेत. “इथे कोणताही मराठी आला तर…”, तसेच “ये ठाणे का गांधीनगर है…” अशा धमकीपूर्ण भाषा वापरून दादागिरी केल्याचे दिसत असल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक मराठी नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. शिविगाळ करणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.

घटनाकाळात काही युवक दारूच्या प्रभावाखाली असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. पार्किंगवरून सुरू झालेला वाद क्षणात तीव्र झाल्याने पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पुढील कारवाईची तयारी सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment