पूजा खानापुरे, वंदना वानखडे, कोमल नामदास — कोण मारणार बाजी ?
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव नगरपरिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी दिवसेंदिवस तापत असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये थरारक तिरंगी लढत उभी ठाकली आहे. मतदारांच्या मनावर पकड मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांचे उमेदवार मैदानात उतरले असून प्रचाराने जोर धरला आहे.
भाजपाची पूजा सचिन खानापूरे, काँग्रेसची वंदना सखाराम वानखडे आणि शिवसेना (उबाठा) ची कोमल महादेव नामदास यांच्यात तडाखेबंद मुकाबला रंगणार असून प्रत्येकाने आपल्या ताकदीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
प्रभागातील रस्ते, मूलभूत सुविधा, स्वच्छता, महिला सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर उमेदवार मतदारांशी चर्चा करत आहेत. घराघरांत भेटीगाठी, सोशल मीडियावरील प्रचार, तर कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे प्रभागात निवडणूक वातावरण पूर्णतः तापले आहे.
तिन्ही उमेदवारांच्या सक्रियतेमुळे येथील लढत अधिकच रोमहर्षक बनली असून—प्रभाग क्रमांक 1 (अ) मधील सत्तेचा तुरा कोणाच्या माथी? मतदारांचा कौल कोणाला मिळणार? तिरंगी रिंगणात कोण मारणार अंतिम बाजी?
मतदारांचे गणित, पक्षांची रणनीती आणि उमेदवारांची जनसंपर्क मोहीम—या सर्वांवर आता प्रभाग 1 (अ) च्या विजयानिर्णयाची दिशा अवलंबून राहणार आहे.












