---Advertisement---

प्रभाग 2 (अ) मध्ये खरी लढत सुरु! कोण घेणार प्रभाग 2 (अ) मध्ये आघाडी??

---Advertisement---

शेगांव नगरपरिषद निवडणूक २०२५; वैशाली सूळ vs कस्तूरा तराळे

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 (अ) मध्ये द्वीपक्षीय लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. या प्रभागातून भारतीय जनता पक्षाच्या वैशाली प्रमोद सूळ तथा काँग्रेसच्या कस्तूरा महादेव तराळे या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट सामना होत असून मतदारांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दोन्ही पक्षांची परंपरागत मतपेढी, उमेदवारांची ओळख, स्थानिक पातळीवरील कामगिरी आणि जनसंपर्क या सर्व बाबींचा प्रभाव यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थानिक समस्यांवर उपाययोजना, विकासात्मक आश्वासने आणि महिला मतदारांचा कल यावर या लढतीची दिशा अवलंबून राहण्याची शक्यता वर्तवली जाते.

दरम्यान, या दोन्ही उमेदवारांनी जनसंपर्क सुरु करताच प्रभागातील निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे. समर्थकांकडून प्रचाराचा जोर वाढत असून अंतिम टप्प्यात ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

प्रभाग 2 (अ) मध्ये अखेरीस मतदार कोणावर विश्वास दाखवतात आणि या दोघींपैकी कोण बाजी मारते, याकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे. शेवटी प्रश्न हा उरतो – या तिघांपैकी कोण मारणार बाजी?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment