---Advertisement---

प्रभाग 2(ब) मध्ये तीन दिग्गजांची थरारक टक्कर! कोण जिंकणार अंतिम विश्वास?

---Advertisement---

शेगांव(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 (ब) मध्ये त्रीकोणी सामना रंगणार असून मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रभागातून तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात असून निवडणुकीत चुरस वाढली आहे.

प्रभाग 2 (ब) मधून विनोद अशोक मसने (भारतीय जनता पक्ष) किशोर अंकुश शिंदे (काँग्रेस) परमेश्वर रामचंद्र लाहुडकार (मनसे) हे तिन्ही उमेदवार आपला-आपला प्रचार वेगात राबवत असून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभागातील स्थानिक समस्या, विकासकामांचे प्रश्न आणि पक्षनिष्ठा या तीनही गोष्टींचा या निवडणुकीत निर्णायक परिणाम दिसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तीनही उमेदवारांकडून घरघरजवळ संपर्क, सोशल मीडियाद्वारे प्रचार आणि कार्यकर्त्यांची मोहीम जोमाने सुरू असून मतदार कोणाला अंतिम पसंती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या तिघांपैकी कोण मारणार बाजी, कोणाच्या बाजूने मतदारांचा कल झुकणार आणि प्रभाग 2 (ब) चा चेहरा बदलण्याची संधी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment