शेगांव(युवा क्रांती वृत्तसेवा) शेगांव – नगरपरिषद निवडणूक 2025 जवळ येत असताना प्रभाग क्रमांक 6 (ब) मध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. या प्रभागात भाजपचे शरदशेठ अग्रवाल, काँग्रेसचे संजय (किरनबाप्पू) देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रा. भूषण दभाडे यांच्यात त्रिकोणी संघर्ष रंगताना दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घर भेटी, पदयात्रा, संवाद मेळावे आणि लहान सभांतून मतदारांशी थेट संपर्क वाढवला आहे. स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि जनसंपर्क यावर प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्र भर असल्याने लढत अधिकच रंजक झाली आहे.
भाजपचे शरदशेठ अग्रवाल यांचा संघटनावरचा पकड आणि अनुभव, काँग्रेसचे संजय (किरनबाप्पू) देशमुख यांचा नागरिकांमधील संपर्क आणि अनुभव, तर राष्ट्रवादीचे प्रा. भूषण दभाडे यांचे तरुण नेतृत्व – अशा भिन्न शैलीत प्रचार रंगताना दिसत आहे. त्यामुळे मतदार कोणत्या दिशेने कल दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तीनही बाजूंनी जोरदार प्रचारशक्ती लावल्याने प्रभाग 6 (ब) मधील स्पर्धा शिगेला पोहोचली असून अंतिम निकाल कोण पालट घडवतो याकडे सर्वांचीच नजर लागली आहे.










