शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव नगरपरिषद निवडणूक 2025 च्या प्रभाग क्रमांक 4 (अ) मध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा रंगली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सीमा प्रमोदकुमार ओवे आणि भारतीय जनता पक्षाच्या सरस्वती गोपाळ चावरे यांच्यातील ही टक्कर शहरातील मतदारांसाठी सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे.
सीमा ओवे यांनी स्थानिक स्तरावर कामगिरीसह जनतेशी थेट संपर्क साधला असून, या प्रभागातील सामाजिक व लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. तर सरस्वती चावरे यांना पक्षशक्तीचा भक्कम पाठिंबा मिळाला असून प्रचारात गती आणि संघटनात्मक क्षमता यांच्या जोरावर त्यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे.
मतदार वर्गातील उत्सुकता व चर्चेचा पार्श्वभूमी लक्षात घेतली तर प्रभाग 4 (अ) मधील निवडणूक अत्यंत रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. आता एकच प्रश्न चर्चेत आहे – या दोघींपैकी बाजी कोण मारणार?
निवडणुकीची तारीख जवळ येत असल्याने प्रभागातील रंगत आणखी वाढणार हे निश्चितच आहे.












